शिवोली येथे दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून

दोघे पोलिसांच्या कह्यात

पणजी – इग्रीझावाडो, मार्ना, शिवोली येथील मार्था लोबो (वय ६४ वर्षे) आणि वीरा लोबो (वय ६२ वर्षे) या दोन वयस्कर महिलांचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित महिला रोवीना जुलियो लोबो (वय २९ वर्षे) आणि सर्बन राजाबाली या दोघांना कह्यात घेतले आहे. संशयित रोवीना लोबो हिचा पती जुलियो लोबो यांनी या दुहेरी खुनाची माहिती पोलिसांना दिली. या दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.