बोलेरो वाहनाच्या चोरीप्रकरणी धर्मांधाला पोलीस कोठडी

कुडाळ – कुडाळ येथून बोलेरो पिकअप वाहनाची चोरी केल्याप्रकरणी संशयित हबीब रहिमतुल्ला गडकरी (रहाणार कोल्हापूर) याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी बजावली. (लोकसंख्येत अल्प असले, तरी गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध ! – संपादक) कुडाळ तालुक्यातील मुंडेवाडी, झाराप येथील गंगाराम शिवा रेडकर यांचे बोलेरो पिकअप वाहन १० नोव्हेंबरला चोरीला गेले होते. रेडकर यांनी १२ नोव्हेंबरला कुडाळ पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून गडकरी याला १६ नोव्हेंबरला अटक केली होती.