वर्धा येथील बंदीवानाची जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

कारागृहाची कुचकामी सुरक्षा व्यवस्था !

वर्धा – यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील आरोपी गोपीचंद डहाके (वय ३८ वर्षे) याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ६ ऑगस्ट या दिवशी पहाटेच्या सुमारास बंदीवान डहाके याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बंदीवानाच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. बंदीवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.