पुणे – दळणवळण बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद असतांनाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध उत्खनन आणि वाहतूक चालू असल्याचे समोर आला आहे. यावर कारवाई करत जिल्हा प्रशासनाकडून मे आणि जून या दोन मासांत १७ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली असून कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई करण्यात आलेली नव्हती. (पैसे भरल्याने अवैध कामे झाकून जातात, अशी गुन्हेगारांची मानसिकता झाल्यास त्याला प्रशासनाला उत्तरदायी धरायचे का ? – संपादक)