अनधिकृत गोहत्या न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार !

गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्‍या देशात असणे दुर्दैवी !

पुणे शहरातील अधिकृत पशूवधगृहे त्वरित बंद करावीत !- मिलिंद एकबोटे, संस्थापक, समस्त हिंदू आघाडी

शहरातील कोंढवा आणि खडकी येथील अधिकृत  पशूवधगृहे बंद व्हावेत, या मागणीसाठी गोरक्षक, गोसेवक आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांकडून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले.

सांगलीतील गोरक्षक अंकुश गोडसे यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड !

गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जिवावर उदार होऊन गोरक्षणाचे कार्य करणारे सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे.

यवतमाळ येथे अपघातामुळे ६ गोवंशियांची तस्करी उघड !

गोवंशहत्या बंदी कायदा असतांनाही होणार्‍या गोतस्करीच्या घटना गोवंशियांचे हत्यारे उद्दाम झाल्याचे दर्शवतात !

बेल्हे (पुणे) येथे ४ गायी, ११६ वासरांची कत्तलीपासून सुटका !

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. आक्रमक प्रवृत्तीच्या कसायांना यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

Camels Smuggling : ४९ उंटांची धुळे येथून विदर्भात अवैध वाहतूक करणारे दोघे कह्यात !

उंटांच्या वैद्यकीय तपासणीत काही उंट आजारी असल्याचे समोर आले. असे असतांना त्यांना इतक्या लांबपर्यंत नेणे, हे त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखेच आहे. या वरील दोघांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोशाळांना न्याय देणारा आणि गोरक्षकांचा उत्साह वाढवणारा संभाजीनगर सत्र न्यायालयाचा निवाडा !

‘न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) यांनी हसन इमाम कुरेशी या मुसलमानाकडे पशूधन सोपवण्याचा निर्णय घेतला.

ममदापूर (अहिल्यानगर) येथे धर्मांध गोतस्करांकडून गोरक्षकांवर गोळीबार !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे प्रशासनाला लज्जास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस काही करणार का ?

नेवासा (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आणि ७०० किलो गोमांस जप्त !

सातत्याने घडणार्‍या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !