कर्नाटकमधील भाजप सरकार गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार !

कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! ‘असा निर्णय प्रत्येक भाजप शासित राज्यांत घेतला गेला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !

सेरनाभाटी (सालसेत) येथे अनधिकृतरित्या गोवंशियांची हत्या : स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

सेरनाभाटी येथे गोवंशियांची अनधिकृतरित्या हत्या केली जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड घालून ४ संशयितांना कह्यात घेतले आहे.

वणी पोलिसांकडून गोवंश तस्करी करणारी ५ वाहने जप्त आणि ८ जणांना अटक

वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला.

पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी ! – मिलिंद एकबोटे, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ

कसायांकडून दिवसाढवळ्या पोलिसांसमक्ष गोरक्षकांवर आक्रमण झाले याचा अर्थ कसायांना कायद्याचा धाक आणि पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी.  

गोभक्षकांच्या दबावाला शासनाने बळी पडू नये आणि गोवा मांस प्रकल्प चालू करू नये ! – गोव्यातील गोरक्षकांची शासनाकडे मागणी

गोवा शासनाने गोभक्षकांच्या दबावाला बळी पडू नये. उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत चालू करू नये. शासनाने गोव्यातील गोवंशियांसाठी हानीकारक असे कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी गोव्यातील गोरक्षकांनी शासनाकडे केली आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मांस विक्रीची अवैध दुकाने चालू, प्रशासनाकडून दुर्लक्ष

अवैध मांस विक्रेत्यांवर कारवाई न करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांचे कसायांशी आर्थिक संबंध आहेत का ? याविषयी शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी !

महाराष्ट्रात गोवंश रक्षा आणि प्राणी संवर्धन कायदा असतांना ‘बीफ’च्या विक्रीची अनुमती देणे, हा दखलपात्र गुन्हा ! – समस्त हिंदुत्ववादी संघटना, वसई

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे मांसविक्रीच्या दुकानाला अनुमती देण्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

गोमातेच्या रक्षणासाठी शासनाचे सहकार्य असेल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात धवलक्रांती आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोधन वाढवण्यावर भर दिला जात आहे.