नेवासा (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आणि ७०० किलो गोमांस जप्त !

प्रतिकात्मक चित्र

अहिल्यानगर – येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. नेवासा येथे गोवंशियांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या ठिकाणी गेले असता पोलिसांना ७०० किलो गोमांस, तसेच कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आढळले. गोमांस, गोवंशीय जनावरे, लोखंडी सुरा, वजनकाटा असा एकुण ४ लाख १० सहस्र १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तसेच या प्रकरणी कैफ शेख, रफिक शेख, रियाज चौधरी, राजु कुरेशी, तसेच एक अल्पवयीन बालक यांना कह्यात घेण्यात आले आहे. राजु कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध गुन्हे नोंद आहेत.

संपादकीय भूमिका :

सातत्याने घडणार्‍या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !