कर्नाटकमधील गोरक्षकांवर खोटा गुन्‍हा नोंदवल्‍या प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाकडून गोरक्षकांना जामीन संमत

‘कर्नाटकमध्‍ये गोतस्‍करी करणार्‍या इद्रिस पाशा या धर्मांधाची हत्‍या केल्‍याचा  आरोप गोरक्षकावर करण्‍यात आला होता. त्‍यामुळे भारतभरात सर्व पुरोगामी आणि धर्मांध यांनी ‘मॉब लिंचिंग’ (समूह हत्‍या) झाल्‍याची ओरड केली.

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे डिचोली (गोवा) येथे २५ गोवंशियांना जीवदान

गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?

नांदेड येथील गोरक्षकांवर झालेल्‍या आक्रमणाची एस्.आय.टी.च्‍या माध्‍यमातून कारवाई करा !

गोरक्षकांवरील आक्रमणाच्‍या चौकशीविषयी गोरक्षकांनाच सांगावे का लागते ? पोलीस स्‍वतःहून कारवाई का करत नाहीत ?

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना करा ! – अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, अध्‍यक्ष, विधानसभा

भरारी पथकांची स्‍थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्‍यात यावी. त्‍याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्‍याच्‍या, आक्रमणांच्‍या वाढत्‍या तक्रारींची तात्‍काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्‍यात यावेत, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

आषाढी वारीच्या कालावधीत गोवंशियांची तस्करी आणि हत्या रोखा !

२९ जून या दिवशी असणार्‍या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये.

गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करणार्‍या पोलिसांच्‍या विरोधात पुणे येथे चिल्लर फेक आंदोलन’ !

गोरक्षकांवर जाणूनबुजून खोटे गुन्‍हे नोंद केल्‍याविषयी पोलीस प्रशासनावर कारवाई व्‍हावी, यासाठी हे आंदोलन करण्‍यात आले. गोरक्षक श्री. अक्षय कांचन यांनी एक गाडी पकडली होती. त्‍यामधील म्‍हशी पोलिसांनी कोणताही विचार न करता पशूवधगृहामध्‍ये दिल्‍या

इगतपुरी (जिल्‍हा नाशिक) येथे गोमांस तस्‍करीच्‍या संशयातून जमावाच्‍या मारहाणीत एकाचा मृत्‍यू, तर एक घायाळ !

जिल्‍ह्यातील इगतपुरी येथील सिन्‍नर घोटी मार्गावर गंभीरवाडीजवळ २ जणांना गोमांस घेऊन जाण्‍याच्‍या संशयातून अज्ञात १०-१५ जणांकडून मारहाण करण्‍यात आली आहे

गोरक्षकांमुळे वैराग (सोलापूर) येथे ४३ गोवंशियांना कत्तलीपासून जीवदान !

सगळा गोवंश अहिंसा गोशाळेत उतरवण्‍यात आला. ही कारवाई यशस्‍वी करण्‍यासाठी वैराग पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, तसेच सुधीर भाऊ बहिरवाडे, हृषिकेश कामथे, अक्षय कांचन, राहुल कदम, अखिल भारत कृषी गोसेवा संघ सोलापूरचे शहर संघटक प्रसाद झेंडगे, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे धाराशिव प्रमुख रोहित बागल, तुळजापूरचे गोरक्षक अर्जुन देशमुख आदींचे सहकार्य लाभले.

गोवंशियांची कत्तल करणार्‍या आरोपींना ३ वर्षे हद्दपार करण्‍याची बजरंग दलाची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून असे निर्णय का घेत नाही ?

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज, श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान, अमरावती

गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ?