आज ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन !
छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण, नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्य यांवर हे पुस्तक आधारित आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण, नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्य यांवर हे पुस्तक आधारित आहे.
शिवप्रतापदिनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त येतात. यासाठी अधिकच्या एस्.टी. बसेस सोडाव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था आदी मूलभूत सोयी-सुविधांचे नियोजन होणे आवश्यक आहे.
भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !
नौदलदिनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून मालवण आणि परिसराचे रूप पालटून गेले आहे.
एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.
आता यावरून कथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी कंपूने भारतीय नौदलाचे भगवेकरण होत असल्याची आवई उठवण्यास आरंभ केला, तर आश्चर्य वाटू नये !
मालवण येथील समुद्रकिनार्यावर असलेल्या राजकोट या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या ४५ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलदिन सोहळा नौदलाच्या तळापासून अन्य ठिकाणी साजरा होत आहे. याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून जिल्ह्यासाठी हा सोहळा सुवर्णक्षण ठरणार आहे !
आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.
वन विभागाच्या वतीने या लोखंडी जिन्यासाठी वन पर्यटन विकास योजनेंतर्गत ७ लाख २४ सहस्र रुपये व्यय करण्यात आले.