
बागलकोट (कर्नाटक) – कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (के.एस्.आर्.टी.सी.च्या) बसमध्ये अवैधपणे गोमांस वाहतूक करणार्या शकीरा बेपारी नावाच्या मुसलमान व्यक्तीला हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. आरोपी शकीरा बेपारी बागलकोट शहरातील बसस्थानकात सिमेंटच्या पोत्यात गोमांस भरून बसमध्ये चढला. तो गोमांसासह प्रवास करत असल्याचे कळताच बसचालकाने शकीराला बसमधून खाली उतरवले. (केवळ खाली उतरवून न थांबता, बसचालकाने आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार करणे अपेक्षित होते ! – संपादक)
याविषयी हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी शकीराला पकडून पोलिसांकडे सुपुर्द केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये काँग्रेसची राजवट आल्यापासून धर्मांधांचे मनोबल वाढले आहे, हेच अशा घटनांवरून दिसून येते ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ? |