|
वणी (यवतमाळ), १२ मार्च (वार्ता.) – येथील दरबार चिस्ती हॉटेलमध्ये गोमांसयुक्त बिर्याणी विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावर त्याविषयी बजरंग दलाच्या गोरक्षकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांसमवेत बजरंग दलाचे ४ गोरक्षक तेथे गेल्यानंतर १०० हून अधिक मुसलमानांनी गोरक्षकांना पोलिसांसमोरच मारहाण केली. या वेळी एका गोरक्षकाला त्याचे कपडे फाडून मारहाण करण्यात आली. काही पोलीस गोरक्षकांना वाचवण्यासाठी गेल्यावर धर्मांध मुसलमानांनी पोलिसांवरही हात उगारला. या मारहाणीत गोरक्षकांना डोळे, तोंड आणि पाठ येथे जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक धर्मांध मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
🚨 Brutal Attack in Wani (Yavatmal)! 🚨
A mob of more than 100 Mu$l!ms attacked 4 Bajrang Dal Go Rakshaks for stopping the illegal beef biryani sale! ⚠️
🔴 Even the police were not spared and faced assault!
Sakal Hindu Samaj demand arrest of culprits and warns of protest and… pic.twitter.com/S703SDWjtC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 13, 2025
‘याविषयी सीसीटीव्ही चित्रण पडताळून आरोपी मुसलमानांना अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी पीडित गोरक्षकांनी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांचे ते कर्तव्यच आहे ! – संपादक) याविषयी अपेक्षित गतीने पडताळणी न झाल्याने सकल हिंदु समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
१. दरबार चिस्ती हॉटेलचा परिसर मुसलमानबहुल आहे. तेथील जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण करून तेथे बांधकामे केलेली आहेत. (पोलीस आणि प्रशासन यांनी वेळीच अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई न केल्याचाच हा परिणाम ! पोलिसांना मुसलमानांकडून झालेली मारहाण पहाता आता तरी ते येथील अतिक्रमणे बुलडोझरद्वारे हटवतील का ? – संपादक)
२. धर्मांध मुसलमानांनी परिसरातील एका महिलेशी हे गोरक्षक छेडछाड करत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. प्रत्यक्षात असे घडले नसल्याची चर्चा चालू होती. (धर्मांध मुसलमान जाणीवपूर्वक खोटी तक्रार करत आहेत, हे उघड असतांना लगेच गुन्हा नोंदवणारे पोलीस महाराष्ट्रातील कि पाकिस्तानातील ? – संपादक)
आरोपींना शिक्षा न झाल्यास धरणे आंदोलनाची चेतावणी !निवेदनात गुन्हेगारांना अटक करून शिक्षा करण्यात यावी, अन्यथा आम्हाला धरणे आंदोलन करावे लागेल. ‘कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण उत्तरदायी रहाल’, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आली. (अशी चेतावणी द्यावी लागणे, हे लज्जास्पद ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|