सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणतीही नोटीस नसून कर्जाची माहिती मागवली आहे ! – सतीश सावंत, अध्यक्ष

कारखाना खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थेट अगर सहभागातून कोणताही कर्जपुरवठा केलेला नाही.

कर्नाळा बँकेच्या संतप्त ठेवीदारांचे ६ जुलैला आंदोलन

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी पनवेल संघर्ष समितीने ६ जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता कळंबोली येथे एम्.जी.एम्. रुग्णालयासमोर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू याचे नेतृत्व करणार आहेत.

शालेय पोषण आहाराचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिक्षक समितीचा विरोध !

उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोष खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने या निर्णयाला पालक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी विरोध केला आहे.

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून एकूण १८ सहस्र १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त

बँकांना ८ सहस्र ४४१ कोटी रुपये केले परत !

हे पैसे भारत कधी परत आणणार ?

स्विस बँकांमध्ये भारतियांनी जमा केलेली रक्कम २० सहस्र कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, अशी माहिती स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेेने १७ जूनला घोषित केलेल्या वार्षिक आकडेवारीतून उघड केली आहे.

स्विस बँकांमध्ये भारतियांची २० सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा !

स्विस बँकांमध्ये कुणी कुणी आणि कधी पैसा ठेवला आहे, हे जनतेला कळले पाहिजे !

‘सहकारी बँकिंग कायद्या’च्या विरोधात नागरी सहकारी बँक असोसिएशन उच्च न्यायालयात जाणार

केंद्र सरकारच्या ‘सहकारी बँकिंग कायद्या’तील दुरुस्तीमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर विपरित परिणाम होणार असल्याचा दावा करत राज्यातील ‘नागरी सहकारी बँक असोसिएशन’ने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

५०० कोटी रुपयांच्या दुसर्‍या ‘पॅकेज’ची रक्कम सेवा सिंधू आणि इतर माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा होणार ! – येडियुरप्पा, मुख्यमंत्री, कर्नाटक

दळणवळण बंदीच्या काळात संकटात सापडलेल्या विविध घटकांसाठी ५०० कोटी रुपयांचे दुसरे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह १९ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट केले !

येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी ३६ लाख ५५ सहस्र २६ रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १९ संचालक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उत्तरदायी धरले आहे.