बँकेच्या महिला व्यवस्थापकाने दाखवलेल्या धाडसामुळे चोराला पकडण्यात यश !
बँकेच्या महिला व्यस्थापक (मॅनेजर) पूनम गुप्ता यांनी धाडसाने त्या चोराचा सामना केला. गुप्ता यांची आक्रमकता पाहून चोर हतबल झाला.
बँकेच्या महिला व्यस्थापक (मॅनेजर) पूनम गुप्ता यांनी धाडसाने त्या चोराचा सामना केला. गुप्ता यांची आक्रमकता पाहून चोर हतबल झाला.
यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्या ‘एयू स्मॉल फायनान्स बँके’च्या विज्ञापनामध्ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान करण्यात आला आहे. यामध्ये विवाहानंतर घरजावई बनवलेला वर (आमीर खान) आणि वधू (कियारा आडवाणी) यांना गृहप्रवेश करतांना दाखवले आहे.
बँक दरोड्याच्या गुन्हेगारीवर आधारित वेब सीरीज आणि चित्रपट पाहून येथील आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरी संरक्षक व्यवस्थापक अल्ताफ शेख (वय ४३ वर्षे) याने बँकेची तिजोरी लुटली. ११ वर्षे एकाच बँकेत काम करत असल्याने त्याला बँकेच्या तिजोरीसह अन्य गोष्टींचीही माहिती होती.
‘रूपी बँके’तील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर प्रशासकाद्वारे बँकेचे कामकाज चालू होते. वर्ष २०१३ मध्ये निर्बंध घातले. तत्कालिन १५ संचालकांसह इतर अधिकारी मिळून ६९ जणांविरोधात चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या अधिकोषाचे अध्यक्ष सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून त्यांची चौकशी चालू आहे.
रिझर्व्ह बँकेने रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित करण्याचा आदेश काढला; पण पुण्यातील ५ ते ६ बँका अडचणीत आहेत. या बँका विलीन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्नही चालू होते; मात्र विलीनीकरणाची चर्चा चालू असतांनाच रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित केला. यामुळे ठेवीदारांना धक्का बसला आहे.
कराड येथील ‘कराड जनता सहकारी बँके’च्या व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी चालू आहे. आता बँकेच्या कर्मचार्यांना दिलेल्या कर्जाचीही पोलीस चौकशी करणार आहेत.
नवीन ‘अॅप इन्स्टॉल’ करून वीज शुल्क न भरता बँकेने पुरवलेल्या ‘अॅप’द्वारे वीज शुल्क भरल्यास फसवणूक होणार नाही.
चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम ही ‘गुंतवणूक उत्पादन’च्या रूपात असल्याचे कारण देत ग्राहकांना ती काढता येणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे हेनान प्रांतात सहस्रो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत.