जिल्हा बँकेच्या निवडणुकीस ‘सहकार निवडणूक प्राधिकरणा’ची मान्यता !

आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे सहकार विभागाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्गात ‘पंतप्रधान मुद्रा अर्थसाहाय्य योजने’ची कार्यवाही करण्यास राष्ट्रीयकृत बँकांची टाळाटाळ !

सर्व वित्तीय संस्थांनी सर्व परिस्थितीचा विचार करून गरजूंना विनासायास अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

बनावट कर्ज वाटप प्रकरणी सेवा विकास बँकेच्या अध्यक्षांसह २७ जणांवर गुन्हा नोंद !

दोषी अधिकार्‍यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.

नगर येथील अधिकोषात बनावट सोने गहाण ठेवून ५ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी १५९ कर्जदारांविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रत्येक क्षेत्रातील लोकांची वृत्ती भ्रष्ट होत असल्याची उदाहरणे समोर येणे हे गंभीर आहे. यासाठी बनावट सोने गहाण ठेवून कर्ज देणारे, घेणारे आणि संबंधित सर्वांनाच त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

बनावट चावीच्या साहाय्याने पुणे येथील ए.टी.एम्.मधून ७ लाख रुपयांची चोरी

चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक राजू कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ३ अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा ! – महाराष्ट्र स्टेट बँक एमप्लॉईज फेडरेशनचे आवाहन

हेतुपुरस्सर कर्ज बुडवणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कर्ज थकविणार्‍यांना निवडणुकीस उभे रहाण्यास प्रतिबंध करावा

दहा वर्षांत राष्ट्र्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ सहस्र ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात !

बँकांनी उद्योजक आणि व्यावसायिक यांना अवाजवी कर्जवाटप केले. वसुलीसाठी दीर्घकाळपर्यंत सवलत दिली. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबवण्यास बँका अपयशी ठरल्या.

‘नाबार्ड’कडून सातारा जिल्हा बँकेला ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (‘नाबार्ड’) यांच्याकडून प्रतिवर्षी उत्कृष्ट कार्यक्षमतेविषयीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ बँक पुरस्कार दिला जातो. तो या वर्षी सातारा जिल्हा बँकेला प्रदान करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणतीही नोटीस नसून कर्जाची माहिती मागवली आहे ! – सतीश सावंत, अध्यक्ष

कारखाना खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थेट अगर सहभागातून कोणताही कर्जपुरवठा केलेला नाही.

कर्नाळा बँकेच्या संतप्त ठेवीदारांचे ६ जुलैला आंदोलन

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी पनवेल संघर्ष समितीने ६ जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता कळंबोली येथे एम्.जी.एम्. रुग्णालयासमोर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू याचे नेतृत्व करणार आहेत.