Vishwa Prasanna Teertha Swamiji : बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचार पहाता देवाला प्रार्थना करणे, हाच आपल्यासमोर पर्याय ! – पेजावर श्री विश्‍व प्रसन्न तीर्थ स्वामी, उडुपी, कर्नाटक

देवाला प्रार्थना करणे, हा प्रभावी पर्याय आहेच. यासह समष्टी स्तरावरील प्रयत्न म्हणून हिंदूंनी स्वतःसह देशातील सर्व हिंदूंच्या आणि नंतर विदेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे !

CM Yogi On Bangladeshi Hindu : बांगलादेशातील हिंदूंसाठी कुणीच काही बोलत नाहीत !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रहार !
बांगलादेशातील आताच्या स्थितीची फाळणीच्या वेळेशी केली तुलना !

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पावले उचलावीत ! – उदय महा, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

बांगलादेशात हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. तेथे २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले.

बांगलादेशातील हिंदूंवरील वाढती आक्रमणे लक्षात घेऊन हिंदूंना सुरक्षा पुरवा ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

चंदगड येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले. या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विश्वनाथ महाराज पाटील, श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. महांतेश देसाई, तालुका उपाध्यक्ष श्री. तुकाराम मरगाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Paris (FRANCE) Protest : सहस्रावधी हिंदूंचे बांगलादेशातील हिंदूंच्‍या नरसंहारावरून आंदोलन !

पॅरिस (फ्रान्‍स) येथील ऐतिहासिक ‘प्‍लेस दे ला रिपब्‍लिक’ (रिपब्‍लिक स्‍क्‍वेअर) येथे स्‍थानिक वेळेनुसार १२ ऑगस्‍टच्‍या दुपारी ३ वाजता सहस्रावधी हिंदू एकवटले. त्‍यांनी बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या नरसंहाराविषयी वाचा फोडत जोरदार आंदोलन केले.

Mirza Fakhrul Islam Alamgir : (म्‍हणे) ‘सीमेवर सीमा सुरक्षा दल बांगलादेशी लोकांची हत्‍या करतो !’ – मिर्झा इस्‍लाम आलमगीर, ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्‍या सैनिकांनी बांगलादेशी लोकांची हत्‍या केली असती, तर भारतात ५ कोटी मुसलमान बांगलादेशी घुसखोर राहू शकले असते का ? अशा भारतद्वेष्‍ट्यांचा भरणा असलेला पक्ष जर बांगलादेशात सत्तेवर आला, तर भारताला ती मोठी डोकेदुखीच होणार, हेच अशा वक्‍तव्‍यांवरून लक्षात येते !

Bangladesh M Sakhawat Hossain : (म्‍हणे) ‘बांगलादेशाच्‍या सूत्राांमध्‍ये हस्‍तक्षेप केल्‍यास भारताचीही परिस्‍थिती बिकट होईल !’ – बांगलादेशाचे गृहमंत्री हुसेन

पाकिस्‍तानपाठोपाठ आता छोटासा बांगलादेशही भारताला धमकावू लागला आहे. भारत या दोघांच्‍या विरोधात आक्रमक धोरण कधी अवलंबणार ?

Bangladesh Terrorist Groups : बांगलादेशामधील अस्‍थिरतेमुळे जिहादी आतंकवादी संघटना सक्रीय होण्‍याची शक्‍यता !

इस्‍लामी देश आणि जिहादी आतंकवादी संघटना हे कधीही वेगळे होऊ शकत नाही. वरकरणी तसे दिसत नसले, तरी ते आतून एकमेकांना साहाय्‍य करतात, हेच सत्‍य आहे !

US Role : शेख हसीना यांना पदच्‍युत करण्‍यात अमेरिकेचा सहभाग नाही ! – कॅरिन जीन पियरे

अमेरिकेचा इतिहास आणि वर्तमान पहाता यावर कोण विश्‍वास ठेवणार ? अमेरिका कधीही ‘तिचा यात हात होता’, हे स्‍वीकारणार नाही !

Interim Government To Sheikh Hasina : बांगलादेशामध्‍ये परत या; पण गदारोळ करू नका !

बांगलादेशात परत गेल्‍यावर शेख हसीना सुरक्षित राहू शकतील का ? याची निश्‍चिती अंतरिम सरकार देऊ शकेल का ? आणि त्‍याच्‍यावर विश्‍वास ठेवता येईल का ?