उडुपी (कर्नाटक) – बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार पाहून पुष्कळ दु:ख होत आहे. संपूर्ण हिंदु समाजाने जागृत व्हावे आणि विश्वशांतीसाठी देवाला प्रार्थना करावी, हेच आपल्यासमोर पर्याय आहेत, असे विधान पेजावर मठाचे स्वामी विश्व प्रसन्न तीर्थ यांनी एका व्हिडिओद्वारे केले.
स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘आपल्या देशातील सर्व हिंदूंनीही अत्यंत चिंताग्रस्त होण्याची वेळ आली आहे. आज शेजारच्या देशातच नाही, तर स्वदेशातही हिंदूंवर आक्रमणे वाढली आहेत. त्याविरुद्ध आवाज उठवणार्यांवर दबाव आणला जात आहे. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक जण जागृत राहिला पाहिजे. सरकारवर अवलंबून रहाण्याची परिस्थिती नाही. देवाच्या चरणी शरण जाऊन ’समाज, देश आणि विश्वात शांतता अन् समृद्धी नांदावी’, अशी प्रार्थना करूया.’’
संपादकीय भूमिकादेवाला प्रार्थना करणे, हा प्रभावी पर्याय आहेच. यासह समष्टी स्तरावरील प्रयत्न म्हणून हिंदूंनी स्वतःसह देशातील सर्व हिंदूंच्या आणि नंतर विदेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे ! |