ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर बांगलादेशात जिहादी आतंकवादी संघटनांना मोकळे रान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध होते. त्यामुळेच त्यांच्या राजवटीत आतंकवादी संघटनांवर अंकुश ठेवण्याचे काम झाले; मात्र हसीना यांचे सरकार पडल्यानंतर या संघटना पुन्हा सक्रीय झाल्याचे म्हटले जात आहे. देशात झालेल्या हिंसाचारामागेही याच संघटना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आतंकवादी कारवाया करण्यासाठी बांगलादेशमधील ‘अन्सारूल्ला बांगला टीम’ (एबीटी) या आतंकवादी संघटनेशी हातमिळवणी केल्याचीही माहिती समोर आली आहे.
२. शेख हसीना यांना बांगलादेशातून पळवून लावण्यामागे पाकिस्तानच्या आय.एस्.आय. या गुप्तचर यंत्रणेने महत्त्वाचा हात असल्याचेही समोर येत आहे. ‘एबीटी’सह जमात-ए-इस्लामी आणि इतर संघटना यांच्याशी आय.एस्.आय.चा थेट संपर्क होता, असे सांगण्यात येत आहे.
३. भारतात कारवाया करण्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि एबीटी या संघटनांनी वर्ष २०२२ मध्ये एकत्र येऊन बांगलादेशामध्ये तळ स्थापन केला होता. वर्ष २०२२ मध्ये त्रिपुरामध्ये एका मशिदीची तोडफोड झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर तेथील हिंदूबहुल भागांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच वर्षी त्रिपुरामध्ये एबीटी संघटनेचे ५० ते १०० आतंकवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, अशीही माहिती समोर आली होती. आसामध्येही कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या एबीटीच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती.
बांगलादेशमधील सक्रीय असलेल्या जिहादी आतंकवादी संघटना
१. अन्सारूल्ला बांगला टीम
२. अन्सार अल-इस्लाम
३. लष्कर-ए-तोयबा
४. हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी बांगलादेश
५. जागराता मुस्लिम जनता बांगलादेश
६. जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश
७. पुरबा बांगलार कम्युनिस्ट पार्टी
८. इस्लामी छात्र शिबिर
९. इस्लामिक स्टेट
संपादकीय भूमिकाइस्लामी देश आणि जिहादी आतंकवादी संघटना हे कधीही वेगळे होऊ शकत नाही. वरकरणी तसे दिसत नसले, तरी ते आतून एकमेकांना साहाय्य करतात, हेच सत्य आहे ! |