Interim Government To Sheikh Hasina : बांगलादेशामध्‍ये परत या; पण गदारोळ करू नका !

अंतरिम सरकारचे शेख हसीना यांना आवाहन

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे गृह व्‍यवहार सल्लागार एम्. शखावत हुसैन व बांगलादेशाच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्‍हा बांगलादेशात येण्‍याचे आवाहन केले आहे; मात्र त्‍याच वेळी देशात आल्‍यावर गदारोळ न करण्‍याचाही सल्ला दिला आहे.

अंतरिम सरकारचे गृह व्‍यवहार सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम्. शखावत हुसैन यांनी शेख हसीना यांना उद्देशून म्‍हटले की, तुम्‍ही स्‍वेच्‍छेने गेला आहात. तुम्‍ही पुन्‍हा तुमच्‍या देशात परत येऊ शकता; पण कोणताही गदारोळ करू नका; कारण लोक आणखी चिडतील. तुम्‍ही परत यावे; पण देशाला अराजकतेत ढकलू नका. नवीन चेहर्‍यांसह तुमचा पक्ष पुन्‍हा उभा करा, असा सल्लाही त्‍यांनी दिला.

महंमद युनूस यांनी दिली ढाकेश्‍वरी मंदिराला भेट

अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी १३ ऑगस्‍ट या दिवशी सकाळी बांगलादेशाची राजधानी ढाका येथे असणार्‍या ढाकेश्‍वर मंदिराला भेट दिली. या वेळी त्‍यांनी हिंदूंशी चर्चा केली. त्‍याच वेळी ‘मायनॉरिटी राईट्‍स मूव्‍हमेंट’ या संघटनेच्‍या ५ सदस्‍यांच्‍या शिष्‍टमंडळाने महंमद युनूस यांची भेट घेऊन त्‍यांच्‍याकडे ८ मागण्‍यांचे निवेदन सादर केले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात परत गेल्‍यावर शेख हसीना सुरक्षित राहू शकतील का ? याची निश्‍चिती अंतरिम सरकार देऊ शकेल का ? आणि त्‍याच्‍यावर विश्‍वास ठेवता येईल का ?