बांगलादेशाचे गृहमंत्री हुसेन यांची धमकी
ढाका – बांगलादेशात अंतरिम सरकारने पदभार स्वीकारला आहे; मात्र काही शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना चालूच होत्या. बांगलादेशाचे गृहमंत्री (गृह व्यवहार सल्लागार) ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम्. सखावत हुसेन यांनी हिंदूंसह अल्पसंख्याकांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. भारताने शेजारी म्हणून बांगलादेशला साहाय्य केले पाहिजे; पण आमच्या अंतर्गत गोष्टींत हस्तक्षेप टाळला पाहिजे. भारताने बांगलादेशाच्या अंतर्गत सूत्रांमध्ये हस्तक्षेप केल्यास त्याची परिस्थिती चांगली होणार नाही, असे त्यांनी एका मुलखतीत म्हटले आहे.
हुसेन पुढे म्हणाले की, आम्हाला भारताने शेख हसीना यांना साहाय्य करणे अपेक्षित नव्हते. असे असले, तरी भारत आणि बांगलादेश यांच्यात काश्मीरसारख्या सूत्रावरून लढाई नाही. ते पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला न दिल्यामुळे तिने बांगलादेशात अराजक माजवले, असा आरोप केला होता. त्याविषयी विचारले असता हुसेन म्हणाले की, हे वक्तव्य हास्यास्पद आहे. सेंट मार्टिन बेट हे मोठा अँटिनाही लावण्याच्याही लायकीचे नाही. ते केवळ तीन किलोमीटर लांबीचे आहे. अशा वक्तव्यातून त्या लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपादकीय भूमिकापाकिस्तानपाठोपाठ आता छोटासा बांगलादेशही भारताला धमकावू लागला आहे. भारत या दोघांच्या विरोधात आक्रमक धोरण कधी अवलंबणार ? |