Assam CM On Rohingya : भारतात बांगलादेशातील हिंदू नाहीत, तर रोहिंग्या मुसलमान घुसखोरी करत आहेत !

  • आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली माहिती

  • १३८ घुसखोरांना पकडून परत पाठवले

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – गेल्या २ महिन्यांत आम्ही १३८ घुसखोर शोधले आहेत आणि त्यांना परत पाठवले आहे. मला एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते की, ‘बांगलादेशातील छळामुळे हिंदू भारतात येत आहेत’, असे सांगितले जाते; मात्र आपण घुसखोरांमध्ये केवळ रोहिंग्या मुसलमानांनाच पहात आहोत. यात हिंदू नाहीत. ते बांगलादेशातून आपल्या देशात येत नाहीत, अशी माहिती आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. ‘बांगलादेशातून कोण येत आहेत ?, याची मला पर्वा नाही. बांगलादेशातून अवैधपणे घुसलेल्या लोकांना परत पाठवायचे आहे’, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री सरमा यांनी घुसखोरी रोखण्यासाठी त्रिपुरा राज्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

आसामने रोखलेले घुसखोर बंगालमध्ये घुसखोरी करतात !

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, काही लोकांची ओळख पटवली जात आहे. ते भारतात घुसखोरी केल्यानंतर बांगलादेशात परत जातात आणि नवीन घुसखोर आणतात. बांगलादेशातून येणारे घुसखोर, ज्यांना आसामने रोखले आहे, ते पुन्हा बंगालमधून प्रवेश करतात. बंगालने सहकार्य केल्यास घुसखोर भारतात येऊ शकणार नाहीत. (बंगालमध्ये घुसखोर मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस सत्तेवर असल्याने त्यांना भारतात घुसखोरी करण्यास मोकळे रान मिळते आणि घुसल्यावर सर्व सोयीही मिळतात त्यामुळेच तेथे अधिक घुसखोरी होते. ही स्थिती पालटण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे ! – संपादक)