काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी

अशी मागणी करण्याची वेळ का येते ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत सत्तेत असलेल्या सर्वपक्षीय सरकारांनी अशी चौकशी का केली नाही ? केंद्र सरकारने वेळ न दवडता अशा प्रकारची समिती स्थापन करून सत्य समोर आणावेे !

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

‘द कश्मीर फाइल्स’ने आता दडपलेला सत्य इतिहास देशासमोर आणण्याला प्रारंभ केला आहे. आता हळूहळू सर्वच इतिहास समोर आणून पीडित हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न होणे हा काळानुसार होत असलेला पालटच होय !

होळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरही हिंदूंवरच कारवाई होत असल्याने ३० हिंदूंचे पलायन

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर असा अन्याय होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या घटनेची चौकशी करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांना मी उत्तरदायी असेन, तर मला फाशी द्या !’ – फारुख अब्दुल्ला

असे सांगून फारुख अब्दुल्ला स्वतःविषयी सहानुभूती मिळवू पहात आहेत. हिंदूंवरील अत्याचारांना कोण उत्तरदायी आहे, हे आता जनतेला समजले आहे.

‘राजीव गांधी यांनी काश्मीरमधील हिंदू आणि शीख यांचे पलायन रोखण्यासाठी आवाज उठवला होता !’ – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा संसदेत दावा

जर गांधी यांनी आवाज उठवला होता, तर काश्मिरी हिंदू आणि शीख यांचे पलायन का रोखले गेले नाही, हे चौधरी का सांगत नाहीत ?

आता ‘गोवा इन्क्विझिशन’वर आधारित ‘द गोवा फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती व्हावी ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदुत्वनिष्ठ

३२ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसधार्जिण्या विचारधारेमुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटली नाही.

‘लज्जा’ पुस्तकावरून चित्रपट काढण्याचे धाडस अद्याप कुणीही केलेले नाही ! – लेखिका तस्लिमा नसरीन यांची खंत

या पुस्तकामध्ये बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात येत असलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे.

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !

‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपट करमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकार्‍यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदु बांधवांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षण घोषित करण्यात आले होते.

केवळ क्षमा नाही, तर शिक्षा हवी !

पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) पक्षाचे सरचिटणीस जावेद बेग यांनी ‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी मुसलमानांनी क्षमा मागितली पाहिजे. आमच्या मागील पिढीने हिंदूंवर अत्याचार केले, ही त्यांची चूक होती’, असे म्हटले आहे.