‘राजीव गांधी यांनी काश्मीरमधील हिंदू आणि शीख यांचे पलायन रोखण्यासाठी आवाज उठवला होता !’ – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा संसदेत दावा

  • जर गांधी यांनी आवाज उठवला होता, तर काश्मिरी हिंदू आणि शीख यांचे पलायन का रोखले गेले नाही, हे चौधरी का सांगत नाहीत ? – संपादक
  • राजीव गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी काश्मीरमध्ये हिंदू आणि शीख यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष केले होते, हेच वास्तव आहे, ते काँग्रेसवाले कधी मान्य करणार ? – संपादक
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी

नवी देहली – वर्ष १९९० मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राजीव गांधी यांनी काश्मीरमधून हिंदूंच्या होत असलेल्या पलायनावर आवाज उठवला होता. त्यांनी तत्कालीन व्ही.पी. सिंह सरकारला काश्मीरमध्ये हस्तक्षेप करून हिंदू आणि शीख यांच्यावर होत असलेले अत्याचार रोखण्याची मागणी केली होती, असा दावा काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत केला.
चौधरी पुढे म्हणाले की, वर्ष १९९० मध्ये व्ही.पी. सिंह यांचे सरकार भाजपच्या समर्थनामुळे चालत होते. त्या वेळी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन  यांनी हिंदूंना आणि ख्रिस्त्यांना सांगितले होते, ‘आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही, तुम्ही काश्मीरच्या बाहेर निघून जा.’ त्या वेळी भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी यांची रथयात्रा चालू झाली होती आणि त्याचे व्यवस्थापन आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते. त्या वेळी केवळ राजीव गांधी यांनी पलायनावर आवाज उठवला होता.

सौजन्य न्युज २४x ७

काश्मिरी हिंदू आणि शीख यांच्यावरील अत्याचारांची चौकशी व्हावी ! – भाजपचे खासदार सुनील कुमार सिंह

भाजपचे खासदार सुनील कुमार सिंह

भाजपचे खासदार सुनील कुमार सिंह यांनी लोकसभेत मागणी केली की, वर्ष १९८० ते १९९० या कलावधीत काश्मीरमध्ये हिंदू आणि शीख यांच्यावर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना शिक्षा करावी. विशेष म्हणजे वर्ष १९८४ ते १९८९ पर्यंत राजीव गांधी पंतप्रधान होते. त्या वेळी काश्मीरमध्ये अटकेत असलेल्या ७० आतंकवाद्यांना सोडण्यात आले होते. याच आतंकवाद्यांनी नंतर काश्मीरमध्ये अत्याचार केले.