नागपूर येथे ‘टॉसिलीझुमॅब’ इंजेक्शनचा काळाबाजार करतांना तिघांना अटक

येथे ‘टॉसिलीझुमॅब’ इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या होमिओपॅथीच्या २ आधुनिक वैद्यांसह तिघांना पोलिसांनी २६ मे या दिवशी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात सट्टेबाजाने ‘सीबीआय’कडे जबाब नोंदवला !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणार्‍या सोनू जालान याने मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे स्वत:हून जबाब नोंदवला आहे. अटक टाळण्यासाठी १० कोटी रुपये देण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप

संभाजीनगर येथे पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी माजी सैनिकाला अटक !

दळणवळण बंदीच्या काळात केलेल्या नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी अडवून १ सहस्र २०० रुपयांचा दंड ठोठावल्याचा राग आल्याने माजी सैनिक भगवान सानप (वय ३५ वर्षे) यांनी वाहतूक पोलिसांना शिरस्त्राणाने मारहाण केली

सवा कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापदी मंगलदास बांदल यांना अटक

बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते; पण १ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना काढण्यात आलेले असून त्यांच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसांत अनेक गुन्हे नोंद आहेत.

रेल्वेतून परदेशी प्राण्यांची तस्करी करणार्‍या दोघांना पुणे ते लोणावळा या दरम्यान अटक

पुणे ते लोणावळा या दरम्यान मार्ग पोलिसांनी त्यांना संशयावरून कह्यात घेतले असता त्यांच्याकडून २७९ कासव, १ सहस्र २०७ इग्वाना आणि २३० फायटर मासे जप्त करण्यात आले आहेत.

चीनला शिनजियांग प्रांतातील उगूर मुसलमानांचे अस्तित्वच संपवायचे आहे ! – अहवाल

भारतातील मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर गळे काढणारे पाक आणि जगातील अन्य इस्लामी राष्ट्रे आता चीनच्या या इस्लामविरोधी कृत्याविषयी गप्प का ? आता चीनविरुद्ध ते जिहाद का पुकारत नाहीत ?

सहकार्य केल्यास परमबीर सिंह यांना ९ जूनपर्यंत अटक करणार नाही ! – राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका

ठाणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सहकार्य केल्यास त्यांना ९ जूनपर्यंत अटक करण्यात येणार नाही, असे म्हणणे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे.

खेड (पुणे) तालुक्यातील शाळेच्या आवारात मद्याची पार्टी करणार्‍यांना अटक  

दळणवळण बंदीच्या काळात सर्व दुकाने बंद असतांना पार्टी करण्यासाठी दारू कुठून मिळाली, याचा शोध घेऊन संबंधितांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे.

नांदेड येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय ‘बॉम्ब’ने उडवून देण्याची धमकी देणार्‍या धर्मांधास अटक !

धर्मांध अशी धमकी देऊ शकतो, याचा अर्थ राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली आहे कि नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यास आश्‍चर्य ते काय ?

मीरारोड येथे १ लाख ८० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ४ धर्मांधांना अटक

अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य !