नांदेड येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय ‘बॉम्ब’ने उडवून देण्याची धमकी देणार्‍या धर्मांधास अटक !

  • स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
  • धर्मांध अशी धमकी देऊ शकतो, याचा अर्थ राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली आहे कि नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यास आश्‍चर्य ते काय ?

नांदेड – ‘१० कोटी रुपये द्या, अन्यथा येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अन्य शासकीय कार्यालयांसह संपूर्ण नांदेड शहर ‘बॉम्ब’ने उडवून टाकू,’ अशा धमकीचा ‘ई-मेल’ पाठवणारा आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ (वय ३५ वर्षे) याला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ मे या दिवशी अटक केली.

१. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘ई-मेल’ आयडीवर ८ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता एक ‘ई-मेल’ आला होता. त्यामध्ये वरील धमकीचा संदेश लिहिलेला होता.

२. ‘जिल्ह्यातील १२५ ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ (संवेदनशील क्षेत्र) निवडले असून ‘बॉम्ब’ फुटायला सिद्ध आहेत’, असेही वरील धमकीत म्हटले होते. यासमवेतच धर्मांध शेख याने या ‘ई-मेल’ला सर्व कार्यालयांची सूची जोडली होती. घडलेल्या प्रकाराविषयी पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात आली होती.

३. तांत्रिक साहाय्य घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण केले. पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरून शेख याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. धर्मांध रफीकला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.