हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून बारामती येथील विवाहितेची आत्महत्या

विवाहात सोने कमी दिल्याच्या कारणास्तव, तसेच विवाहानंतरही वडिलांकडून ५० तोळे सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी पतीकडून होणार्‍या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

आंध्रप्रदेश सरकार आणि पोलीस यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारने त्याचे ख्रिस्तीप्रेम उघड करणार्‍या स्वपक्षातील खासदाराला अधिकारांचा दुरुपयोग करून अटक केली. ही सरकारची मोगलाई असून हा लोकशाहीचा अवमानच आहे. यासाठी न्यायालयाने संबंधितांना शिक्षा केली पाहिजे !

चित्रपटसृष्टीला अर्थसाहाय्य करणारे युसूफ लकडावाला यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

हिंदी चित्रपटसृष्टीला अर्थसाहाय्य करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून २९ मे या दिवशी अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी दिली आहे.

मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्रीराम’ लिहून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून २ धर्मांध मुलांनीच ते लिहिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना येथील सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती मिळाली.

सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील बांगलादेशी आरोपीचा पोलिसांवर आक्रमण करून पळून जाण्याचा प्रयत्न !

देशातील कोट्यवधी घुसखोर बांगलादेशींना कधी हाकलणार ?

जीवघेणी आक्रमणे केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा पोलिसांच्या कह्यात !

अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तानाजी पवार यांना अटक केली होती. गोळीबार झाल्यानंतर काही घंट्यांतच पवार याने बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह २१ जणांविरुद्ध जीवघेणे आक्रमण केल्याप्रकरणी तक्रार दिली.

महिला पोलीस कर्मचार्‍याला पोलीस ठाण्यातील रायफल चोरीच्या प्रकरणी अटक

असे ‘चोरटे’ पोलीस समाजात होणार्‍या चोर्‍या काय रोखणार ?

पुणे जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार करणार्‍याला अटक

जनतेला लुटणार्‍या अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

बांगलादेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ५ बांगलादेशी तरुणांना अटक

बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?

पी.एन्.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी याला डॉमेनिकात अटक

पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला मेहूल चोक्सी याला डॉमेनिका या देशातून अटक करण्यात आली. तो नुकताच अँटिग्वा देशाच्या ‘शेल्टर’मधून बेपत्ता झाला होता.