चीनला शिनजियांग प्रांतातील उगूर मुसलमानांचे अस्तित्वच संपवायचे आहे ! – अहवाल

भारतातील मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर गळे काढणारे पाक आणि जगातील अन्य इस्लामी राष्ट्रे आता चीनच्या या इस्लामविरोधी कृत्याविषयी गप्प का ? आता चीनविरुद्ध ते जिहाद का पुकारत नाहीत ?

बीजिंग – चीनला देशातील शिनजियांग प्रांतातील उगूर मुसलमानांचे अस्तित्वच संपवायचे असून त्या दिशेने तेथील सरकारचे नियोजनबद्धपणे काम चालू आहे, अशी धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. या अहवालातील माहितीनुसार शिनजियांग प्रांतातील सर्वांत मोठ्या मशिदीच्या इमामाला चीनने वर्ष २०१७ मध्येच कारागृहात टाकले असून त्यांना १५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासह अनेक मुसलमान नेत्यांना विविध आरोपांखाली कारागृहात टाकण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर शिनजियांग प्रांतातील मुसलमानांची विचारसरणी पूर्णपणे कम्युनिस्ट करण्यासाठी सर्व मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत. परिणामी या प्रांतातील मशिदीतील मुसलमान आता सरकारचीच भाषा बोलू लागले आहेत. अमेरिका आणि ब्रिटन यांनी चीनमधील उगूर मुसलमानांवरील अत्याचारांना ‘नरसंहार’ असे संबोधले असून त्यांच्या देशांतील संसदेत याविरोधातील ठरावही संमत केले आहेत.