अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य !
ठाणे – मीरारोड येथील नयानगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी १ लाख ८० सहस्र रुपयांच्या मेफेड्रोन या अमली पदार्थासह रोकड, असा एकूण ४ लाख ८३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्तमश युसूफ शेख (वय ३० वर्षे), शोएब नूर मोहम्मद कुरेशी (वय ३१ वर्षे), अल्ताफ युनूस शेख (वय ३८ वर्षे), शमशेर उपाख्य शम्मी मोहम्मद कुन्नी (वय २८ वर्षे) या चौघांना अटक केली आहे. याचे पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत. (लोकांना नशेच्या आहारी पाडणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना गुन्हे करतांना कायद्याचे भय राहिलेले नाही ! – संपादक)