संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परमवीर चक्राने सन्मानित सैन्याधिकार्‍याच्या पत्नीच्या पायांना स्पर्श करून केले वंदन !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष १९७१ च्या युद्धात शौर्य दाखवल्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले कर्नल होशियार सिंह यांच्या पत्नी धन्नो देवी यांच्या पायांना स्पर्श करून वंदन केले.

(म्हणे) ‘हेलिकॉप्टरच्या अपघातामागे भारतीय सैन्याचा बेशिस्तपणा उत्तरदायी !’

असे खोटे आरोप करून भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्या निधनावर गोव्यातील अविनाश तावारिस याची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ !

तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांविषयी आक्षेपार्ह विधान करणे हा राष्ट्रद्रोहच ! यालाही आता काही अतीशहाणे बुद्धीवादी ‘विचार स्वातंत्र्य’ ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ वगैरे गोंडस नावाने पाठीशी घालतील ! यातून भारतात बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूच अधिक, हे सिद्ध होते !

जनरल रावत यांच्या मृत्यूनंतरचे पडसाद !

८ डिसेंबर या दिवशी भारताचे सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर देशात उमटत असलेल्या द्वेषमूलक प्रतिक्रिया चिंताजनक असून भारताचे अंतर्गत हितशत्रू कोण कोण आहेत ? यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

चीनचा प्रखर विरोधी असलेल्या तैवानचे सैन्यदलप्रमुख आणि बिपिन रावत या दोघांच्या हेलिकॉप्टर अपघातांमध्ये साम्य !

संरक्षणतज्ञांकडून चीनच्या भूमिकेवरून प्रश्‍न उपस्थित

देहलीतील कॅन्टोनमेंट येथे बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार

हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांचे मृतदेह तमिळनाडूतील ‘मद्रास रेजिमेंट सेंटर’मध्ये आणण्यात आले आहेत. येथून जनरल रावत आणि मधुलिका यांचे पार्थिव देहलीत आणण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह व्हेंटिलेटरवर !

‘ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली.

कुन्नूर (तमिळनाडू) येथे सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ‘सी.डी.एस्.’ जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

अशा प्रकारच्या अपघातांमध्ये सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि वैमानिक मृत्यू पावणे, ही सैन्याची मोठी हानी आहे. याकडे गांभीर्याने न पहाणार्‍या आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शानकर्त्यांना हे लज्जास्पद आहे !

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण सैनिक करत असल्याने आपले जीवन सुरक्षित आहे ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

मी एक भारतीय म्हणून मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हावासियांनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी