प्रदीप कुरुलकर यांनी क्षेपणास्त्रासह ‘आकाश लाँचर’ची सर्व गुपिते पाकिस्तानला दिल्याचे ए.टी.एस्.च्या अन्वेषणात निष्पन्न !
कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.त विकसित केलेल्या ‘कंपोझिट हल’, ‘ब्रह्मोस लाँचर’, ड्रोन, यू.सी.बी. ‘अग्नी मिसाईल लाँचर’, ‘मिलिटरी ब्रिजिंग सिस्टिम’ आणि ‘मिलिटरी इंजिनिअरिंग इक्विपमेंट’ सिद्ध करणे, विकसित करणे, ‘डिझाइन’ करण्याचे काम आणि इतर सुरक्षेसंबंधित गोपनीय संवेदनशील माहिती झारादास गुप्ता नाव धारण केलेल्या पाकच्या महिलेला दिली.