मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

नवी देहली – गेल्या साधारण दीड मासापासून ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवादी आणि हिंदु मैतेई यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. मध्यंतरी शांत झालेला संघर्ष गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा उफाळला असून खामेलोक गावात हिंसात्मक कारवाया करण्यात आल्या. १३ जूनच्या रात्री कुकी आतंकवाद्यांनी येथील मैतेईबहूल भागात केलेल्या आक्रमणात ९ लोकांचा मृत्यू झाला, तर १० जण घायाळ झाले. आक्रमणकर्त्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असल्याचे म्हटले जात आहे.

१. येथील फौगाकचाओ इखाई गावात कुकी समुदायाचे लोक मैतेई यांच्या क्षेत्रांमध्ये छावण्या बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच कुकी आतंकवादी आणि सुरक्षा बलाचे सैनिक यांच्यामध्ये गोळीबार झाला.

२. राज्यात इंटरनेट १५ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

३. पूर्वोत्तर समन्वयक समितीचे अध्यक्ष आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी नुकताच मणीपूर येथील हिंसेचा आढावा घेतला. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीचा एकूण आढावा सादर करणार आहेत.

४. कुकी आतंकवादी हे मैतेई समुदायातील लोकांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचेही समोर आले आहे. विष्णुपूर जिल्ह्यातील फोइगक्चाओ इखाई गावातील ग्रामीण लोकांना हे ड्रोन मिळाले आहेत.

५. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात एकूण १०० हून अधिक लोक ठार झाले असून ३२० जण घायाळ झाले आहेत, तर ४७ सहस्त्र लोकांना साहाय्यता शिबिरांचा आश्रय घ्यावा लागला आहे.

संपादकीय भूमिका

कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !