महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रामाणिक चर्चासत्रांना अमेरिकेत अनुमती नाही ! – ‘फॉक्स न्यूज’चे माजी निवेदक आणि प्रसिद्ध पत्रकार टकर कार्ल्सन

कथित द्वेषपूर्ण समस्यांवरून भारताला वेठीस धरणारी अमेरिका स्वत:च्या देशातील समस्यांच्या संदर्भात अप्रामाणिक आहे. यामुळे आता भारताने अमेरिकेला खडसावत तिला तिची जागा दाखवून द्यायला हवी !

अमेरिकेतील गेल्या ५० वर्षांत ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा ठेवणार्‍यांच्या संख्येत २६ टक्क्यांची घट !

हिंदु धर्म त्यागून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर होऊ पहाणार्‍या नतद्रष्ट हिंदूंच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही आकडेवारी आहे. भारतातील ख्रिस्ती मिशनर्‍यांनीही याविषयी बोलावे !

भारतियांना पाकिस्तान नाही, तर चीन सर्वांत मोठे आव्हान वाटते ! – अमेरिकेतील खासदार रो खन्ना

भारतीय लोक पाकिस्तानऐवजी चीनला सर्वांत मोठे सैनिकी आव्हान मानतात, असे विधान अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी केले आहे.

अमेरिकेत गर्भपाताच्या औषधासाठीची अनुमती कायम !

अमेरिकेत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशामुळे गर्भपातासाठी सामान्यपणे वापरत असलेल्या औषधांसाठीची अनुमती रहित करण्यात आली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रहित करत या औषधांसाठीची अनुमती कायम ठेवली आहे.

रशियाकडून भारताला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा ठप्प !

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून चालू केलेल्या युद्धानंतर अमेरिकेसह अनेक पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. आता रशियाने भारताच्या शस्त्रांंची आयात रोखली आहे.

युरोपने शहाणे व्हावे !

युरोपने अमेरिकेच्या मागे स्वत:ची फरफट करून घेऊ नये, असे विधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केल्यावर अमेरिकेला ते झोंबले आहे. ‘मॅक्रॉन हे जर संपूर्ण युरोपच्या वतीने बोलत असतील, तर अमेरिकेने केवळ चीनला रोखण्यावर लक्ष द्यावे आणि युक्रेनमधील युद्ध युरोपला हाताळू द्यावे’, अशी टीका एका अमेरिकन खासदाराने केली आहे.

भारतासमोर उत्तरसीमा सुरक्षित राखण्याचे आव्हान ! – अमेरिका

अमेरिकेच्या ‘सी-१३०’ या सैन्य सामुग्री घेऊन जाणार्‍या विमानातील महत्त्वपूर्ण भाग हा भारतीय बनावटीचा आहे. या माध्यमातून आम्ही भारताचा सैन्य क्षेत्रातील उद्योग वाढण्यासाठी त्याला साहाय्यही करत आहोत.-एक्विलिनो

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्‍याविषयी अमेरिकेला रस का आहे ?

एक वर्षाच्‍या प्रदीर्घ काळानंतर रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धामध्‍ये कुणीही जिंकू शकलेले नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे. सध्‍याच्‍या लष्‍करी कोंडीमुळे वाटाघाटी करून युद्ध बंद करणे, हा एक उपाय आहे.

अमेरिकेत ‘गुप्त पोलीस ठाणे’ उभारणार्‍या चिनी नागरिकांना अटक

या दोघांना ‘आपली चौकशी होणार’, असे लक्षात येताच त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दोन व्यक्तींतील संबंधांपेक्षा अधिक चांगले ! – अमेरिका

असे विधान अमेरिकेतील ‘यू.एस्. नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’चे ‘इंडो पॅसिफिक कोऑर्डिनेटर’ असलेले कर्ट कँपबेल यांनी केले. ते येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.