अमेरिकेत ‘गुप्त पोलीस ठाणे’ उभारणार्‍या चिनी नागरिकांना अटक

न्यूयॉर्क – मॅनहॅटन येथील चायनाटाऊनमध्ये गुप्तरित्या ‘चिनी पोलीस ठाणे’ उभारणार्‍या २ चिनी वंशाच्या नागरिकांना पोलिसांनी अटक केली. ६१ वर्षांचे लियू जियानवांग आणि ५९ वर्षांच्या चेन जिनपिंग अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांनी ‘चायनाटाऊन’ येथे चिनी पोलीस ठाणे चालू करून त्याद्वारे चीनला गुप्त माहिती पुरवली.

या दोघांचा चीन सरकारशी थेट संपर्क होता, असे अमेरिकी पोलिसांनी सांगितले आहे. अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या चिनी नागरिकांना चिथावण्याचे काम अटक करण्यात आलेले जियानवांग आणि जिनपिंग करत होते. या दोघांना ‘आपली चौकशी होणार’, असे लक्षात येताच त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही पोलीस अधिकार्‍यांनी दिली.