चीन आणि भारत यांच्यातील शत्रुत्वामुळे आशियामध्ये होत आहे पालट !
भारताने चीनच्या कूटनीतीला मुत्सद्देगिरीने प्रत्युत्तर देण्यासह त्याची नांगी कायमची ठेचण्यासाठी लष्करी कारवाईही करणे आवश्यक !
भारताने चीनच्या कूटनीतीला मुत्सद्देगिरीने प्रत्युत्तर देण्यासह त्याची नांगी कायमची ठेचण्यासाठी लष्करी कारवाईही करणे आवश्यक !
एक वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये कुणीही जिंकू शकलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या लष्करी कोंडीमुळे वाटाघाटी करून युद्ध बंद करणे, हा एक उपाय आहे.
२५ फेब्रुवारी या दिवशी आपण ‘शी जिनपिंग यांचे घातकी विस्तारवादी धोरण, शी जिनपिंग यांचा शासनकाळ एकाधिकारशाही आणि आव्हान न देण्याजोगा असलेला आणि चीनचे आक्रमक परराष्ट्र धोरण आणि त्याचा परिणाम’, ही सूत्रे वाचली. आज हा या लेखाचा अंतिम भाग ….
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे.