महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रामाणिक चर्चासत्रांना अमेरिकेत अनुमती नाही ! – ‘फॉक्स न्यूज’चे माजी निवेदक आणि प्रसिद्ध पत्रकार टकर कार्ल्सन

‘फॉक्स न्यूज’चे माजी निवेदक आणि प्रसिद्ध पत्रकार टकर कार्ल्सन यांचा खळबळजनक दावा

प्रसिद्ध पत्रकार टकर कार्ल्सन

न्यूयॉर्क (अमेरिका) – महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रामाणिक चर्चांना अमेरिकेत अनुमती नाही, असे वक्तव्य प्रसिद्ध अमेरिकी पत्रकार आणि निवेदक टकर कार्ल्सन यांनी केले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २ दिवसांतच कार्ल्सन यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ जारी करून स्वत:ची भूमिका मांडली.

कार्ल्सन यांनी या व्हिडिओमधून अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना (‘मेनस्ट्रीम मीडिया’ला) धारेवर धरले.

ते म्हणाले की,

१. बहुतेक चर्चासत्रांचे विषय ‘संदर्भहीन’ आणि ‘अविश्‍वसनीयरित्या मूर्ख’ या प्रकारात मोडतात, तसेच मुख्य विषयांवर कुणी बोलत नाही.

२. युद्ध, नागरी स्वातंत्र्य, उदयास येत असलेले विज्ञान, नैसर्गिक साधनसुविधा यांसारख्या आपले भविष्य घडवणार्‍या विषयांवर कोणतीच चर्चा होत नाही.

३. अमेरिकेतील दोन्ही मुख्य राजकीय पक्षांचे ‘कोणत्या सूत्रांचा आपल्याला राजकीय लाभ मिळेल’, यावर एकमत झाले आहे. अर्थपूर्ण चर्चा होऊ न देण्यासाठी दोन्ही पक्ष कार्यरत झाले आहेत. अमेरिकी प्रसारमाध्यमांवरील ही वाढती ‘सेन्सॉरशिप’ धोक्याची आहे.

४. टकर कार्ल्सन यांचा ‘टकर कार्ल्सन टूनाईट’ हा ‘फॉक्स न्यूज’वरील कार्यक्रम अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक होता.

संपादकीय भूमिका

  • कथित द्वेषपूर्ण समस्यांवरून भारताला वेठीस धरणारी अमेरिका स्वत:च्या देशातील समस्यांच्या संदर्भात अप्रामाणिक आहे. यामुळे आता भारताने अमेरिकेला खडसावत तिला तिची जागा दाखवून द्यायला हवी !