आम्ही युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे देणार नाही ! – चीन

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे.

टेक्सास (अमेरिका) येथील डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे १८ सहस्र गायींचा मृत्यू !

डेअरीमध्ये यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे हा स्फोट झाला. यामुळे तेथे आग लागली. या अपघातात एक जण गंभीररित्या घायाळही झाला आहे.

टि्वटरचे पूर्वीचे चिमणीचे चित्र (लोगो) कायम !

टि्वटरचे सर्वेसर्वा मस्क यांनी टि्वटरचे पूर्वीचे चिमणीचे चित्र (लोगो) कायम ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी चिमणीचे चित्र पालटून त्याजागी कुत्र्याचे चित्र ठेवले होते.

अमेरिकेतील चक्रीवादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

३१ मार्च आणि १ एप्रिल या दिवशी हे चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळामुळे असंख्य लोकांची घरे उद्ध्वस्त झाली.

भारतीय सीमेवर चीनच्या प्रक्षोभक कुरापती असल्याने भारताला साथ दिली पाहिजे !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या उप साहाय्यकांचे आवाहन !

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील विधानसभेत हिंदुद्वेषाची निंदा करणारा प्रस्ताव संमत !

जॉर्जिया राज्याच्या विधानसभेचे हिंदूंकडून आभार ! जेथे हिंदूंचा द्वेष करण्याचा प्रयत्न एका षड्यंत्राद्वारे केला जातो, अशा ठिकाणी असा प्रयत्न सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे !

भारतद्वेष्‍ट्ये नि काँग्रेसप्रेमी अमेरिका अन् जर्मनी !

लोकशाहीची हत्‍या करणारी अमेरिका आणि जर्मनी यांना राहुल गांधी यांच्‍या निलंबनावरून भारताला सुनावण्‍याचा कोणता अधिकार ?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत खलिस्तानवाद्यांकडून धमकी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची अमेरिकेत रहाणारी मुलगी सीरत यांना खलिस्तानवाद्यांकडून दूरभाष करून धमकी देण्यात आली, तसेच शिवीगाळ करण्यात आली. सीरत ही भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.

भारतीय राजनैतिक कार्यालयांवर झालेल्या आक्रमणांचा निषेध करतो ! – अमेरिका

नुसते तोंडी निषेधाचे बुडबुडे न सोडता आक्रमण करणार्‍या, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणार्‍या खलिस्तान्यांवर अमेरिकेने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची कृती करावी !

जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले ! – जागतिक बँक

त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.