(म्हणे) ‘तैवान चीनचाच भूभाग असल्याने या प्रकरणी कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही !’ – चीनची चेतावणी

चीन अशा प्रकारची दादागिरी करणार असेल, तर सर्व जगाने आणि संयुक्त राष्ट्रांनी चीनवर बहिष्कार घातला पाहिजे !

अमेरिका तालिबानशी चर्चा करणार

अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिका आता तालिबानसमवेत प्रथमच चर्चा करणार आहे. ‘कतारची राजधानी दोहा येथे दोन दिवस ही चर्चा होणार आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकी सैन्याकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे !

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अमेरिकी सैन्याकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे  होती. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ३ सहस्र ८०५ होती, तर वर्ष २०१८ मध्ये ३ सहस्र ७८५ अण्वस्त्रे होती.

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याने होऊ शकणार्‍या धर्मयुद्धात भारताचा विजय निश्चित ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अमेरिकेसारख्या ‘सुपर पॉवर’ला हरवले, हे तालिबानच्या डोक्यात आहे आणि हेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण होऊ शकते. त्यातून निर्णायक धर्मयुद्ध होईल.

पाकिस्तानमध्ये १२ जिहादी आतंकवादी संघटनांना आश्रय

अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक !

जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिल्या १५७ प्राचीन भारतीय कलाकृती !

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलाकृती आणि पुरातन वस्तू कोणत्याही देशाचा अमूल्य ठेवा आहे. अशा कलाकृती आणि वस्तू यांची होणारी चोरी, करण्यात येणारा अवैध व्यापार अन् तस्करी यांचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटीबद्ध आहेत.

भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे ! – अमेरिका

भारताचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ सदस्य देशांचीही (अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) यास सहमती आहे.

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे.

अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने तेथील राज्ये ऑक्टोबर ‘हिंदु वारसा मास’ म्हणून साजरा करणार !

जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावलेल्या निधर्मी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी चमूला चपराक !

पंतप्रधान मोदी यांच्याकडून अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हॅरिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले.