पाकिस्तानमध्ये १२ जिहादी आतंकवादी संघटनांना आश्रय

अमेरिकेतील ‘काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’चा अहवाल !

  • ५ आतंकवादी संघटनांचे लक्ष्य भारत ! – संपादक
  • अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक ! – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ‘काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’ (सी.आर्.सी.) संस्थेच्या अहवालानुसार जगभरात सक्रीय असलेल्या आतंकवादी संघटनांपैकी १२ संघटना पाकिस्तानमध्ये आहेत. या १२ संघटनांपैकी ५ संघटनांचे लक्ष्य भारत आहे, असे यात म्हटले आहे. यातील काही संघटना वर्ष १९८० पासून पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत, असेही यात म्हटले आहे.

या अहवालानुसार

१. लष्कर-ए-तोयबाची स्थापना वर्ष १९८० मध्ये पाकिस्तानमध्ये करण्यात आली होती. वर्ष २००१ मध्ये ही संघटना जागतिक आतंकवादीहरकत संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. वर्ष २००८ मध्ये या आतंकवादी संघटनेने मुंबईत आतंकवादी आक्रमण केले. या संघटनेने याव्यतिरिक्तही आतंकवादी कारवाया केल्या आहेत.

२. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेची स्थापना वर्ष २००२ मध्ये करण्यात आली. मसूद अझहर या आतंकवाद्याने या संघटनेची स्थापना केली. जैश-ए-महंमदने भारतात अनेक आतंकवादी कारवाया केल्या आहेत.

३. हिजबुल मुजाहिदीनची स्थापना वर्ष १९८९ मध्ये एक राजकीय पक्ष म्हणून झाली होती; मात्र या संघटनेकडून अनेक आतंकवादी आक्रमणे करण्यात आली. वर्ष २०१७ मध्ये या आतंकवादी संघटनेला ‘जागतिक आतंकवादी संघटना’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

४. हरकत-उल्-जिहाद-इस्लामी या आतंकवादी संघटनेची स्थापना वर्ष १९८० मध्ये करण्यात आली. सोव्हिएत सैन्याविरोधात या संघटनेची स्थापना झाली; मात्र वर्ष २०१०  पर्यंत ही ‘जागतिक आतंकवादी संघटना’ झाली. माहितीनुसार वर्ष १९८९ नंतर या संघटनेने भारतात विविध आतंकवादी आक्रमणे घडवून आणली आहेत.