अवैध आणि चिनी फटाक्यांची विक्री थांबवणे, तसेच मिठाईतील भेसळ रोखणे यांसाठी मुंबई येथे धर्मप्रेमींचे पोलिसांना निवेदन

चीनचे फटाकेही बाजारात आहेत. त्यांच्यामुळे प्रदूषण होत असल्याने ते अधिक धोकादायक आहेत. अशा फटाक्यांवर बंदी घालावी, यासाठी मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समिती, वज्रदल आणि श्रीराम गणेश मंदिर मित्र मंडळ या संघटनांनी निवेदन दिले.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यातील सारसबाग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती; मात्र सध्या कोरोनाचे प्रमाण न्यून होत असल्याने अनेक मासांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती.

कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

कर्नाटकात मराठा समाज महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका सभागृहात जागेअभावी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाचा नकार

भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.

वीज कर्मचार्‍यांनी घेतला संप मागे !

दळणवळण बंदी काळापासून अद्यापर्यंत वीज कर्मचारी प्राणांची पर्वा न करता काम करत आहेत. शासनाने इतर विभागातील कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले; मात्र वीज कर्मचार्‍यांना यापासून वंचित ठेवले.

महानगरपालिका शाळांमधील गळती ?

महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या भौगोलिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; पण तेथील शाळांची संख्या दिवसेंदिवस न्यून होत चालली आहे, हे दुर्दैवी आहे. परभणी महापालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या केवळ २ शाळाच शेष आहेत.

बंगालमध्ये दिवाळीत फटाके वाजवण्यावरील बंदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

कोलकाता उच्च न्यायालयाने कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना बंदी घालण्याचा आदेश दिला होता.

‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांनी ७ दिवसांत मराठी ‘अ‍ॅप’ चालू न केल्यास दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू ! – मनसेची चेतावणी

महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अ‍ॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी

कृषी विधेयकाचा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना लाभ ! – पृथ्वीराज चव्हाण

मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे.=पृथ्वीराज चव्हाण

सावंतवाडीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.