कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे एअर इंडियाकडून ओमान आणि सौदी अरेबिया येथील विमानसेवाही स्थगित

कोरोनाच्या नव्या प्रकाराचे भारतात संक्रमण होऊ नये म्हणून एअर इंडियाने ब्रिटनसह ओमान आणि सौदी अरेबिया येथे जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे.

गोवा मांस प्रकल्पात हत्या करण्यासाठी शेजारच्या राज्यांतून पशू आणण्यास नोंदणीकृत दलालांना अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

“३० टक्के लोकांसाठी आपल्याला हे करावे लागत आहे”, तर गोव्यातील ७० टक्के हिंदूंच्या भावनांचा तुम्ही कुठेच विचार करत नाही. यापुढे असे चालणार नाही.

मुरगाव शहराला दिलेले वास्को-द-गामा नाव आणि विविध सार्वजनिक ठिकाणांना दिलेली पोर्तुगीज नावे पालटावी ! – भारतमाता की जय संघटना

गेल्या ६० वर्षांत हा पालट झालेला नसणे गोमंतकियांसाठी दुर्दैवी ! टी.बी. कुन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘गोंमतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ तो हाच !

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य

तालुक्यातील कोंडये येथील सौ. मयुरी मंगेश तेली या ऑक्टोबर २०२० मध्ये अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्या होत्या. सौ. मयुरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाल्यामुळे महसूल विभागाने त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिरातील जीर्ण झालेल्या ९ मूर्ती पालटणार

श्री विठ्ठल मंदिर आणि परिवार देवता यांमधील २८ मूर्तींतील ९ मूर्ती जीर्ण झाल्या असून त्या भंग पावल्या आहेत.

नवीन संशोधनाला ‘आंतरराष्ट्रीय पेटंट’ मिळवून देण्यासाठी राज्यशासन अर्थसाहाय्य करणार ! – नवाब मलिक, कौशल्य विकासमंत्री

संशोधन करणार्‍या होतकरूंना राज्यशासनाकडून २ ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे

भाजपचे नगरसेवक दया शंकर यांची नागपूर येथील महापौरपदी वर्णी

नागपूर शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी असणार आहेत.

जमावबंदी असतांना मिरवणूक काढल्याने सातारा येथील भाजप सरपंचांसह ५२ जणांवर गुन्हा नोंद

सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !

वणी (यवतमाळ) येथील भालर शिवारात वाघांची दहशत

प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढून गावकर्‍यांना वाघांच्या दहशतीपासून मुक्त करावे !

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफझलखान आणि सय्यद बंडा यांची कबर परिसर शिवभक्तांना पहाण्यासाठी खुला करावी ! – श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाची निवेदनाद्वारे मागणी

शिवप्रतापामुळे आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, हुशारी आणि युद्धनीती यांचीही जाणीव होते. त्यामुळे हा परिसर तात्काळ खुला करण्याची आवश्यकता आहे.