मेरठच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रदूषणामुळे ७ शिक्षकांची स्थानांतराची मागणी

संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

८ वर्षांपूर्वी हिंदु तरुणीशी विवाह करणार्‍या मुसलमानाची घरवापसी !

कासिम याने म्हटले की, माझे पूर्वज बाबरचे वंशज नव्हते, असे मला वाटत होते. आमचे पूर्वजही हिंदु समाजाचाच भाग होते. मी आज माझ्या समाजामध्ये आलो आहे. संपूर्ण कुटुंब माझ्यासमवेत आहे. कोणत्याही दबावाविना मी धर्मांतर केले आहे.

उत्तरप्रदेशात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यास गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात पुन्हा बलात्कार !

रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे दर्शवणारी आणखी एक घटना ! अशा पोलिसांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी जनतेने केल्यास त्याच चुकीचे ते काय ?

अनुसूचित जाती-जमातींमधील बांधवांना अजूनही पुरेश सुविधा नाहीत ! – मद्रास उच्च न्यायालय

स्वातंत्र्यानंतरच्या ७३ वर्षांत अनुसूचित जाती आणि जमाती यांना विविध सुविधा देण्याच्या योजना आणि कायदे करूनही जर त्यांना पुरेशा सुविधा मिळालेल्या नसतील, तर त्याला आतापर्यंतचे शासनकर्ते आणि प्रशासन हेच उत्तरदायी आहेत !

नववर्षांनिमित्त एकमेकांना भेटतांना हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्कार’ म्हणा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

‘राज्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दिवसाची किंवा रात्रीची संचारबंदी लादली जाणार नाही; मात्र प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेणे आवश्यक आहे.

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करा अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडू

शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित आयआयटी प्रकल्प पुढील आठवड्याच्या आत रहित करून तो अन्यत्र स्थलांतरित करा अन्यथा यापुढे शेळ-मेळावली येथील ग्रामस्थ मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडतील.

कोल्हापुरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रहित झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया या बँकेचा परवाना रहित करण्यात आला आहे.

उपसभापतिपदाच्या निवडणुकीत मतदान करणे सांविधानिक अधिकार नाही – राज्य सरकार

शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांची उपसभापतिपदी झालेली नियुक्ती कायदेशीर कि बेकायदेशीर याचा निर्णय ७ जानेवारीला देणार असल्याचे खंडपिठाने स्पष्ट केले.

भिवंडीतील काँग्रेसच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना नोटीस दिली

‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थाे दासगुप्ता यांना अटक

‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे.