सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी लाकडी रथ सिद्ध करण्याच्या संदर्भात सप्तर्षींनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन !

‘वर्ष २०२३ च्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवासाठी संपूर्ण काष्ठरथ बनवावा. हा रथ वर्ष २०२२ मधील रथासारखा गाडीवर बांधलेला नसावा. ज्याप्रमाणे मंदिरातील उत्सवाच्या वेळी भक्त देवाचा रथ ओढतात, त्याप्रमाणे श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचा रथ साधकांनी ओढावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याची साधिकेला सूक्ष्मातून जाणवलेली अलौकिक वैशिष्ट्ये !

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तो सर्वाेच्च असा दैवी उत्सव असल्यामुळे महर्षींनी त्याला ‘ब्रह्मोत्सव’, असे संबोधले आहे.

वर्ष २०२२ मधील रथोत्सवासाठी भाड्याने रथ आणल्यावर ‘तो परत करू नये’, असे वाटणे आणि महर्षींनी वर्ष २०२३ मधील रथोत्सवासाठी रथ बनवण्याची आज्ञा देणे

रथोत्सव झाल्यानंतर आम्ही प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘हा रथ परत पाठवण्यासाठी मन सिद्ध होत नाही. आपण हा रथ ठेवून घेऊया का ?’’ तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘हा रथ परत पाठवायचा आहे ना, तर पाठवूया. पुढे देवाची इच्छा असेल, तर आपला रथ सिद्ध होईल.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’त ते विराजमान असलेला रथ ओढण्याची सेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले अनुभूतीरूपी कृतज्ञतापुष्प !

‘ज्याप्रमाणे मंदिरातील देवतेचा रथ तेथील सेवेकरी ओढतात, त्याप्रमाणे श्रीमन्नारायणाचा रथ साधकांनी ओढावा’, या सप्तर्षींच्या आज्ञेनुसार साधकांनी साक्षात् भगवंताचा हा रथ ओढला.

वर्ष २०२३ मधील रथोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना साजेसा रथ बनवण्याची मनातील इच्छा गुरुकृपेने पूर्ण झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

वर्ष २०२२ चा रथोत्सव झाल्यावर एक सूत्र शिकता आले. त्या रथाचा आकार कसाही असला, तरी प.पू. गुरुदेव रथात बसल्यावर रथाच्या त्या आकारातही देवत्व निर्माण झाले होते. ‘भगवंताने साधकांना रथाचा रंग आणि रूप यांच्या पलीकडे नेऊन निर्गुण तत्त्वाची अनुभूती दिली’, असे मला जाणवले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ ओढणार्‍या साधकांचा सराव घेणे आणि रथ ओढणे’, या सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात त्यांचा रथ ओढणार्‍या साधकांचा सराव घेणे आणि रथ ओढणे’, या सेवा चालू झाल्यानंतर शारीरिक श्रम एकदम वाढल्यामुळे माझे शरीर दुखू लागले.

साधकांवरील मायेचे आवरण नष्ट करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ब्रह्म (सनातन) रूपाचे दर्शन दिले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !