साधकांवरील मायेचे आवरण नष्ट करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ब्रह्म (सनातन) रूपाचे दर्शन दिले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

वैशाख कृष्ण सप्तमीच्या शुभतिथीला फार्मागुडी, गोवा येथील मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव भावपूर्णरित्या साजरा झाला. या वेळी रथारूढ श्रीविष्णुरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांना दर्शन दिले. मैदानाच्या मध्यभागी उभा असलेला श्रीमन्नारायणस्वरूपातील श्री गुरूंचा दिव्य रथ आणि ३ गुरूंचे दर्शन यांमुळे साधकांना झालेले सूक्ष्मातील लाभ यांविषयी ईश्वरी ज्ञानातून प्राप्त झालेली सूत्रे श्री गुरुचरणी अर्पण करत आहे. ‘ईश्वराने सांगितले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ब्रह्म (सनातन) रूपाचे दर्शन देणे काळ महिम्यानुसार आवश्यक होते. ही प्रक्रिया ईश्वरी नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने घडली. याचे विश्लेषण पुढे दिले आहे.

१. सूक्ष्मातील आपत्काळ चालू झाल्याचे प्रतीकात्मक चित्र महर्षींनी २०२१ मध्ये बनवून घेणे

वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे विशिष्ट चित्र काढायला सांगितले होते. हे चित्र कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी सिद्ध केले. या चित्रात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. युद्धभूमीचा पार्श्वभाग असून तिथे एक रथ उभा होता, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णरूपधारी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून आशीर्वाद घेत होत्या. या चित्रात युद्धभूमीचा पार्श्वभाग आणि अर्धरथ हे सूक्ष्मातील आपत्काळाचे प्रतीक होते.

२. सूक्ष्मातील युद्ध चालू झाल्याचे प्रतीक म्हणून वर्ष २०२२ मध्ये रथावर आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन घडवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी साधकांना रथावर आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन घडवले. अवतारांनी रथारूढ होणे, हे सर्वत्रच्या साधकांसाठी आपत्काळांतर्गत प्रत्यक्ष युद्धाचा काळ चालू होण्याची नांदी आहे. ज्या प्रकारे महाभारताच्या युद्धात प्रत्यक्ष युद्ध न करता श्रीकृष्णाने ‘सारथ्य स्वीकारणे’, अशी अद्भुत घटना घडली होती, त्याच प्रकारे वर्ष २०२२ मध्ये ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनेक वर्षांनंतर प्रथमच आश्रमातून बाहेर सार्वजनिकपणे समाजात येऊन सर्वांना दर्शन देण्याची अद्भुत घटना घडली होती.

श्री. निषाद देशमुख

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ब्रह्म (सनातन) रूपाचे दर्शन देणे काळानुसार आवश्यक असणे

महाभारताच्या युद्धात स्वतः योगेश्वर श्रीकृष्ण समवेत असतांनाही अर्जुनावर मायेचे आवरण आले आणि त्याच्या मनात युद्धाच्या संदर्भात विकल्प निर्माण झाला. याच प्रकारे वर्तमानकाळात सूक्ष्मातून आपत्काळ असतांनाही अनेक साधकांच्या मनात ‘हिंदु राष्ट्र खरंच येणार का ?’, असा विकल्प आणि मायेचे आवरण निर्माण झाले आहे. अर्जुनाच्या मनातील विकल्प आणि मायेचे आवरण नष्ट करण्यासाठी महाभारत युद्ध प्रांगणाच्या मधोमध श्रीकृष्णाने रथ थांबवून त्याला आपले विश्वरूपाचे दर्शन दिले आणि श्रीकृष्णाने अर्जुनावरील मायेचे आवरण अन् मनातील शंका यांचा नाश केला होता. त्याच प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही ब्रह्मोत्सव कार्यक्रम प्रांगणाच्या मध्यभागात रथ स्थिर करून समष्टी काळानुसार ज्याची अनुभूती घेऊ शकेल, असे ब्रह्म (सनातन) रूपाचे दर्शन दिले आहे.

४. रथोत्सवाच्या माध्यमातून समष्टीवरील मायेचे आवरण अल्प करून त्यांच्या अनुक्रमे चंद्र, सूर्य आणि सुषुम्ना या नाड्या जागृत करून मग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या ‘ब्रह्म (सनातन) रूपाचे’ दर्शन घडवून समष्टीला गुरुगीता सांगणे

४ अ. रथावर आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून प्रक्षेपित ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांमुळे साधकांवरील मायेचे आवरण अल्प होणे : ब्रह्मोत्सवात रथावर आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची स्पंदने प्रक्षेपित होत होती. यासाठी त्या स्पंदनांना पूरक अशी वेशभूषा सप्तर्षींनी तिन्ही गुरूंना करायला सांगितली होती. यामुळे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांच्या माध्यमातून साधकांवर आलेले मायेचे आवरण अल्प होत होते.

४ आ. रथावर आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या विशिष्ट क्रमातील दर्शनामुळे समष्टीच्या चंद्र, सूर्य आणि  सुषुम्ना या नाड्या जागृत होणे : रथोत्सवाच्या माध्यमातून साधकांना रथावर आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाले. रथयात्रा एकदा गोलाकार फिरली. पहिल्या अर्धगोलाकारात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बसलेला भाग दर्शकांकडे येणार, तर दुसर्‍या अर्धगोलाकारात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बसलेला भाग दर्शकांकडे येणार या प्रकारे रथ फिरवण्यात आले. त्यानंतर रथाला मैदानातील प्रांगणाच्या मध्यभागाकडे लावलेल्या मंचाकडे नेण्यात आले. (अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन देण्यापूर्वी श्रीकृष्णानेही पूर्ण युद्धक्षेत्रात रथ फिरवला होता आणि मग मधोमध रथ थांबून अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन दिले होते.)

महर्षि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘चंद्रनाडी’, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘सूर्यनाडी’ असे संबोधतात. सुषुम्नानाडी आणि सूर्यनाडी यांच्या तुलनेत चंद्रनाडी अधिक सगुण आहे. याप्रकारे विशिष्ट क्रमात रथ फिरवण्याच्या माध्यमातून ईश्वराने पहिले समष्टीची चंद्रनाडी, त्यानंतर सूर्यनाडी  आणि मग सर्वांत शेवटी सुषुम्नानाडी चालू करून समष्टीला सगुणातून टप्प्याटप्प्याने निर्गुणाकडे नेले. समष्टीच्या आध्यात्मिक क्षमतेत वाढ झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या ‘ब्रह्म (सनातन) रूपाचे’ दर्शन समष्टीला दिले.

४ इ. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धक्षेत्राच्या मधोमध विश्वरूप दर्शन देणे, त्याच प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व समष्टीला ‘ब्रह्म (सनातन) रूपाचे’ दर्शन देणे : मायेचे आवरण आणि मनातील विकल्प यांमुळे अर्जुन खचल्यावर श्रीकृष्णाने युद्धक्षेत्राच्या मधोमध रथ थांबवून त्याला विश्वरूप दर्शन दिले आणि श्रीमद्भगवद्गीता सांगितली. अर्जुनाने रथावर आरूढ श्रीकृष्ण आणि त्यांच्या मागे त्यांचे विश्वव्यापी रूप पाहिले, म्हणजे एकाच वेळी सगुण आणि निर्गुण रूप पाहिले.

अगदी त्याच प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथही कार्यक्रमस्थळाच्या मधोमध थांबला होता. साधकांनीही रथावर आरूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, म्हणजे सगुण रूप आणि मंचावर समष्टी कार्याचे दायित्व घेणारे संत, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘ब्रह्म (सनातन) रूपाचे’ दर्शन दोन्ही एकाच वेळी घेतले.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१९.५.२०२३)

  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक