दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलमधून पडून महिला पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू !; पत्नीला विलंब झाल्याने पतीकडून विमानात बाँब ठेवल्याची अफवा !…

लोकलने प्रवास करणार्‍या महिला पोलीस कर्मचारी अश्विनी डोमडे (वय २७) यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. नाहूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घडली आहे.

दुकानांवरील पाट्या मराठीत न लावणार्‍या दुकानदारांना नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्याची चेतावणी

आता केवळ सूचना, चेतावणी आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून मराठीची गळचेपी थांबवावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !

‘वन्दे  भारत’ मंगळुरूपर्यंत चालवण्यास आमचा विरोध ! – जयवंत दरेकर, कोकण विकास समितीचे अध्यक्ष

वन्दे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणास ठाम विरोध असून या सेवेचा  मंगळुरूपर्यंत विस्तार केल्यास मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

Chandra Kumar Bose : (म्हणे) ‘सावरकरांना नेताजींसमवेत जोडू नये; कारण नेताजी धर्मनिरपेक्ष नेते होते !’ – नेताजी बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विज्ञापनावरून चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप !

इराण-पाकिस्तान येथील आतंकवाद्यांकडून पश्‍चिम भारतीय समुद्रतटांचा तस्करीसाठी वापर !

भारताची पश्‍चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर पाकिस्तान अन् इराण येथील आतंकवादी गट शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी करत आहेत. यासाठी वापरलेली पद्धत पूर्णपणे चित्रपटांमध्ये दाखवतो, तशी आहे, जेणेकरून ते पकडले गेले, तरी त्यांचा नेता ओळखला जाणार नाही.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची महिला आयोगाची मागणी !

राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने नवी देहलीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या वेळी पथकाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या प्रसंगी पथकाने संदेशखाली येथील पीडित महिलांच्या जबानीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.

Pakistani Public Reaction : (म्हणे) ‘काफिरां’पुढे आम्ही झुकणार नाही !’ – पाकिस्तानी जनता

आर्थिक दिवाळे वाजलेल्या देशाच्या जनतेने केलेल्या अशा वक्तव्यांकडे कोण लक्ष देणार ? अन्य देशांकड भीक मागणार्‍या पाकिस्तानच्या जनतेने आधी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि मग भारताला दरडावून दाखवावे !

चीनसमवेतच्या संरक्षण करारामुळे मालदीवची होणार मोठी हानी ! – पाकिस्तानी तज्ञ

मालदीवचे नवे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी चीनसोबत संरक्षण करार केला आहे. चीनसोबत केलेल्या करारामुळे मालदीवची मोठी हानी होणार आहे, असे मत पाकिस्तानी संरक्षण तज्ञ डॉ. कमर चीमा यांनी त्यांच्या एका ‘व्लॉग’मध्ये याविषयी सांगितले आहे.

कोलकाता येथील पाण्याखालील मेट्रो मार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे देशातील पहिल्या पाण्याखालून धावणार्‍या मेट्रोचे उद्घाटन केले. ही मेट्रो हुगळी नदीच्या पाणी पातळीपासून १३ मीटर खाली बांधलेल्या रुळावरून धावणार आहे.