कोलकाता (बंगाल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे देशातील पहिल्या पाण्याखालून धावणार्या मेट्रोचे उद्घाटन केले. ही मेट्रो हुगळी नदीच्या पाणी पातळीपासून १३ मीटर खाली बांधलेल्या रुळावरून धावणार आहे. यासाठी हावडा स्थानक ते महाकरण स्थानक असा ५२० मीटर लांबीचा बोगदा बनवण्यात आला असून त्यात २ रुळ टाकण्यात आले आहेत. मेट्रो प्रतिघंटे ८० कि.मी. या वेगाने केवळ ४५ सेकंदात हा बोगदा पार करील. या मार्गामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे. या मार्गावरून प्रतिदिन ७ ते १० लाख लोकांचा प्रवास करतील. यात ४ भूमीगत स्थानके आहेत. हावडा स्थानक भूमीपासून ३० मीटर खाली बांधले आहे. हे जगातील सर्वांत खोल मेट्रो स्थानक आहे. सध्या पाण्याखालील मेट्रो मार्ग केवळ लंडन आणि पॅरिस यांच्यामध्ये बांधले जातात.
सौजन्य विऑन