होळी म्हणजेच मदनाचे दहन !
होळीला महाराष्ट्रात ‘शिमगा’ म्हणतात. (दक्षिणेत होळीला ‘कामदहन’ म्हणतात. ‘हुताशनी’, ‘दौलयात्रा’, अशीही होळीला नावे आहेत.) देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.