अंनिसचे भोंदू आव्हान !

एखाद्या गोष्टीचा वैज्ञानिक आधार तपासण्यासाठी त्यामधील गृहितके सिद्ध झाली पाहिजेत, असे म्हणतात. विज्ञाननिष्ठ वैद्यकीय गृहिते निकामी ठरली, तर त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले काही बोलणार नाहीत; पण त्यांना ज्योतिष मात्र अचूकच पाहिजे !

हिंदुत्वाचे लक्षण !

हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दांचा मूळ उगम ऋग्वेदकालीन सप्तसिंधु या आपल्या स्वतःच्या प्राचीनतम राष्ट्रीय अभिधेतच (नावातच) आहे.

ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न  होतो आणि भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढवण्याचा संकल्प करा ! 

ज्या कर्मांनी अंतरात्मा संतुष्ट होतो, ज्या कर्मांकरिता शास्त्र सहमत होते, ज्या कर्मांकरिता सद्गुरु सहमत होतात आणि ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न होतो, तसेच भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढविण्याचा संकल्प करा !

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरण्याची शक्यता !

जग तिसर्‍या महायुद्धाच्या तोंडावर उभे असतांना भारताने अन्य देशांवरचे व्यापाराचे अवलंबित्व न्यून करून स्वयंपूर्ण होणेच हिताचे !

‘कन्यादान’ एक अनोखा सोहळा !

‘हिंदु विवाह कायद्यानुसार लग्नात ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर केवळ ‘सप्तपदी’ महत्त्वाची आहे’, असे नुकतेच अलाहाबाद न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदु धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे महत्त्व अपरंपार आहे. ‘वडील-मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा’ म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.

जळगाव येथील साधिका सौ. जयश्री पाटील यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी रामनाथी आश्रमात पोचल्यावर अनुभवलेली भावस्थिती !

साधक सेवा करत असतांना मला ‘प्रत्येक साधकाच्या अंतरात गुरुकृपेची पुष्कळ तळमळ आहे. ती तळमळ त्यांना सेवा करण्याचे बळ देत आहे’, असे वाटून पुष्कळ शिकायला मिळत होते.

एका शिबिराच्या वेळी  भावजागृतीचा प्रयोग करतांना साधिकेला आलेली अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर बसल्या आहेत आणि संपूर्ण सभागृहात पिवळ्या रंगाचे चैतन्य पसरले आहे.’

श्रीरामाच्या आरतीच्या वेळी पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी (ईश्वरपूर (सांगली)) यांच्या घरी आपोआप आलेली नामजपाची माळ !

आरतीला आलेल्या सर्वांना विचारले, ‘‘ही माळ कुणाची आहे ?’’ तिथे आलेल्यांपैकी कुणाचीही ती माळ नव्हती. संतांनी ती माळ पाहून सांगितले, ‘‘साक्षात् श्रीरामाने तुम्हाला ही माळ भेट दिली आहे.’’

६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. अनंत राकेश देशमाने (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अनंत राकेश देशमाने या पिढीतील एक आहे !