सत्याचरणाचे महत्त्व 

‘योगसाधनेत साधकाच्या दृष्टीने यम-नियमांच्या उतरंडीवर सत्याचरणाला पुष्कळ मोठे महत्त्व आहे. किंबहुना जसा प्राणाविना देह तसा सत्यनिष्ठेविना साधक ! सत्याचरणाचे आणखी महत्त्व असे की, निष्ठा ठेवून आचरणाला आरंभ केला की, तो आपोआपच सत्यमय होतो. इथपर्यंत की, एक तप, म्हणजे बारा वर्षांपर्यंत जर कटाक्षाने सत्य बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या मुखातून जे बाहेर पडेल, ते सत्यच होईल.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)