हिंदुत्वाचे लक्षण !

वीर सावरकर उवाच

श्री. दुर्गेश परुळकर

हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दांचा मूळ उगम ऋग्वेदकालीन सप्तसिंधु या आपल्या स्वतःच्या प्राचीनतम राष्ट्रीय अभिधेतच (नावातच) आहे. ऋग्वेदात ‘सप्तसिंधवः’ हा शब्द दैशिक आणि राष्ट्रीय अर्थी आपल्या वैदिक कालच्या पूर्वजांनी राष्ट्रीय अभिधा (नाव) म्हणून स्वतःस लावलेला आहे. ज्याला सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेली ही भूमी आपली पितृभूमी म्हणून अत्यंत प्रिय वाटते, वैदिक सप्तसिंधूच्या हिमालयीन, उच्च प्रदेशात जिच्या प्रारंभाचा पहिला ठळक असा पुरावा सापडतो आणि नवीन प्रदेश आक्रमित पुढे जात असता ज्याचा ज्याचा तिने तिरस्कार केला, ते ते सर्व आपल्यात समाविष्ट करून जे जे आत्मसात् केले, तेथे परमोत्कर्षाला पोचून जी जाती पुढे ‘हिंदू जाती’ या नावाने भरभराटली, त्या महान जातीचे रक्त या ‘हिंदु’ नावाला पात्र ठरणार्‍या माणसाच्या अंगात खेळत असते. हे हिंदुत्वाचे लक्षण आहे.

संकलन : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर