ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न  होतो आणि भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढवण्याचा संकल्प करा ! 

‘साधक किंवा भक्त यांनी विचार केला पाहिजे, ‘वर्षभरात कोणती कार्ये केल्याने हृदय उद्विग्न झाले ? अशांत झाले ? भगवंत, शास्त्र आणि गुरुदेव यांच्यासमोर लज्जित व्हावे लागले किंवा आपला अंतरात्मा असंतुष्ट झाला ?’ अशी कार्ये, असे धंदे, अशी कामे, अशी मैत्री बंद केली पाहिजे. ज्या कर्मांनी अंतरात्मा संतुष्ट होतो, ज्या कर्मांकरिता शास्त्र सहमत होते, ज्या कर्मांकरिता सद्गुरु सहमत होतात आणि ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न होतो, तसेच भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढविण्याचा संकल्प करा !’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)