सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस :  नदी, तलाव, ओढे, मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे !

सोलापूर येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून १ मेपासून सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस झाले आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.

पुणे येथे रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्यूब घाटात टाकणार्‍या आस्थापनाला १ लाख रुपयांचा दंड !

रुग्णांचे रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर उर्वरित रक्ताच्या नमुन्यांच्या ट्यूब जुन्या कात्रज घाटात टाकून देणार्‍या एन्.एम्. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक आस्थापनावर महापालिकेने कारवाई केली आहे.

ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का ? – चित्रा वाघ, भाजप

‘ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का ?’, असा प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या विज्ञापनात ‘पॉर्न स्टार’ (अश्लील चित्रपटात काम करणार अभिनेता) आहे.

नाशिक येथे पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवून बनावट नोटा देणार्‍याला अटक

७ लाख रुपये दिल्यास त्याची तिप्पट रक्कम देण्याचे आमीष मोहिज फिदारी सैफी (वय ५३) याने दाखवले होते. लाखो रुपये लंपास करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

मैला सफाई करणार्‍या कामगारांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा ! – मुंबई उच्च न्यायालय

मैला सफाई कामगारांच्या समस्यांचे सर्वेक्षण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाला सांगावे लागणे हे दुर्दैवी !

लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक (ता. मावळ) येथील अवैध मशिदीचे बांधकाम त्वरित थांबवावे !

मशीद अवैध असतांनाही तिच्यावर आतापर्यंत कारवाई कशी झाली नाही ? आता तरी तिच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणार का ?

काँग्रेसकडून मुसलमानांचे लांगूलचालन ! – योगी आदित्यनाथ

काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देशाचा सन्मान हरवला होता. आतंकवाद वाढला आणि भ्रष्टाचार बोकाळलेला होता; परंतु १० वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारने ही प्रतिमा पुसून काढली.

गृह मतदानाविषयी ए.आर्.ओ. आणि तहसीलदार यांनी भेट द्यावी ! – निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह

अशा ८५ वर्षांपुढील मतदारांसाठी गृह मतदानाची भारत निवडणूक आयोगाने सोय केल्याबद्दल आरोग्य मंदिर येथील पद्मा आठल्ये यांनी धन्यवाद दिले.  

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत !

शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही निवडणूक असल्याने नारायण राणे विजयी होणार कि विनायक राऊत सलग तिसर्‍या वेळी यश मिळवतात, हे ४ जून या दिवशी कळू शकेल.

शासकीय कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याच्या निर्णयाची १ मेपासून कार्यवाही !

शासकीय कागदपत्रे आणि ओळखपत्र यांवर वडिलांसह आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष कार्यवाही चालू झाली आहे.